मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आली आहेत. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपुष्टात आली आल्याने फडणवीस यांनी त्यांच्या ट्विवटर हँडलवरचं त्यांच्या नावापुढील 'काळजीवाहू मुख्यमंत्री' पद काढून 'महाराष्ट्राचा सेवक' असं लिहलं आहे.
शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिला होता. त्यामुळे बहुमतासाठीचं संख्याबळ नसल्याने भाजपने सरकार बनविण्यास असमर्थ असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्ट केलं होतं. त्यानंतर कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगितलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरील मुख्यमंत्रीपदापुढे 'काळजीवाहू' हा शब्द लिहिला होता. आता हा शब्दही बदलण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तेचा पेच सुटायचे नावच घेत नाहीये. 15 दिवसांपासून घडलेल्या घटनानंतर आता सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेची पहिली संधी भाजपला देण्यात आली होती मात्र भाजपने आपल्याकडे पुरेसे पाठबळ नसल्याने राज्यपालांकडे निवेदन देऊन आपल्याकडे सरकार स्थापनेइतके बहुमत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, तसेच त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची संधी मिळावी अशी विनंती राज्यपालांना केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या व्टिटर हॅडलवरती देखील काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहू असे लिहिले होते. आता सध्या त्यांच्या व्टिटर हॅडलवरती महाराष्ट्र सेवक असे लिहिले आहे. त्याची सध्या सोशल मिडीयात चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.