कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला; फडणवीसांचा ठाकरेंना सवाल

केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेला आहात.
political
politicalesakal
Updated on

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय घडामोडींचा वेग पाहता चुरशीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणूक प्रचारात शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत टीका केली होती. आता त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

political
देशात दिवसभरात ३४ हजार ११३ नव्या रुग्णांची नोंद; ३४६ मृत्यू

ते म्हणाले, शिवसेनेच्या सर्व लोकांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आहेत. केवळ मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेला आहात. युतीमध्ये भाजपासोबत शिवसेना निवडून आली. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) स्टेजवर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली त्यालाही तुम्ही समर्थन दिलं. त्यामुळे राज्याच्या जनतेला कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे नीट माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत या ठाकरेंच्या प्रश्नावर ते म्हणाले, याआधी भाजपा सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. आदित्य ठाकरेंना इतिहास माहिती नाही. पण गोव्यानं प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारलं. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजपा (BJP) लढतंय म्हणून ते लढले नाहीत? गेली २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. पण त्यांचं डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात, असा टोमणा त्यांनी लगावला आहे.

political
पुलवामा हल्ल्याची तीन वर्षे; आतापर्यंत तपासात काय सापडलं?

उत्तरप्रदेशात राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर शिवसेना (Shivsena) २०० जागा लढले होते. एका जागेवरही डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. उलट मित्रपक्ष असूनही भाजपाला जिथे जिथे नुकसान पोहोचवता येईल तो प्रत्येक वेळी प्रयत्न शिवसेनेने केला. पण ते कधीही यशस्वी झाले नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे

भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

political
देशात दिवसभरात ३४ हजार ११३ नव्या रुग्णांची नोंद; ३४६ मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.