Devendra Fadanvis: रात्रीस खेळ चाले? फडणवीसांनी स्पष्ट केलं राज ठाकरेंच्या भेटीत कोणत्या गप्पा झाल्या

देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं राज ठाकरेंच्या भेटीचं कारण
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काल रात्री अचानक उशीरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपनं घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळं या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

या रात्रीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,'बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं, एक दिवस गप्पा मारायला बसु आणि त्याचा मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गोष्टी सोडुन गप्पा मारायच्या असंही फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

Devendra Fadanvis
Fadnavis Meets Thackeray: फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला 'शीवतीर्थ'वर; अचानक भेट दिल्यानं चर्चांना उधाण

तर यावर बोलताना काही राजकीय विश्लेषक बोलताना म्हणाले कि, राज ठाकरे काही दिवसांपासुन वेगळी भुमिका घेताना दिसुन येत आहेत. गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्व आहे.

Devendra Fadanvis
Raj Thackeray :...वादाची किनार उगाचच लागली!; नव्या संसदेच्या उद्घाटनवर राज ठाकरेंची खंत

तर गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि भाजप यांच्या शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसून येत आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. यानंतर भाजप आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर आता रात्रीची ही भेट यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.