Param Bir Singh : ...म्हणून परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतलं! देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

Param Bir Singh
Param Bir Singh
Updated on

Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले आहेत. एवढेच नाही तर डिसेंबर २०२१ मध्ये दिलेले निलंबनाचे आदेशही राज्य सरकारने रद्द केले आहेत.

निलंबनाच्या वेळी ते ऑन ड्युटी होते असे गृहीत धरावे, असेही राज्य सरकारेन म्हटले आहे. दरम्यान परमबीर सिंह यांचे निलंबन का मागे घेतले? यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कॅटने अहवाल दिला आहे. कॅटने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांची डी देखील बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांचे निलंबन देखील कॅटने रद्द केले आहे. आम्ही फक्त या निर्णयाची अमलबजावणी केली आहे.

अनिल देशमुख महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यानंतर परमबीर सिंह यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तेव्हा परमबीर सिंह म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आठवड्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. (Latest Marathi News)

या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले होते.

Param Bir Singh
Kishor Aware: तळेगावातील जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष किशोर आवारेंची निर्घृण हत्या

त्यानंतर परमबीर यांच्याविरोधात देखील अनेक गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत.

मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.

आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका सुरु केली आहे.

Param Bir Singh
The Kerala Story SC : केरळ स्टोरी साऱ्या देशात सुरु, तुमच्याकडेच बंदी का? न्यायालयाची बंगाल, तामिळ सरकारला नोटीस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.