मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी इथं शाईफेकीची घटना घडली. याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. यावर आता गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis first reaction on Chandrakant Patil Ink throw matter)
फडणवीस म्हणाले, "ही खूपच दुर्देवी घटना आहे. चंद्रकांत पाटलांनी जे म्हटलं होतं त्याचा आशय समजून घ्यायला हवा. यातील एखाद्या शब्दांवर वाद होऊ शकतो. पण त्यांच्या म्हणण्याचा आशय असा होत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कधीही सरकारकडून अनुदान घेऊन संस्था चालवल्या नाहीत. त्यांनी लोकांच्या शिक्षणाची व्यवस्था समाजाकडून पैसा गोळा करुन समाजातील दानशूर लोकांना सोबत घेऊन जायचे, इतकचं त्यांना म्हणायचं होतं. पण जाणून बुझून त्यांना एकप्रकारे त्यांच्या शब्दाला पकडून अशी घटना करणं हे चुकीचं आहे"
सर्वांनी बोलताना भान राखणं गरजेचं आहे ते राखलंच पाहिजे. पण त्याचसोबत विधानांचा आशय काय आहे हे ही समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आम्ही जर अशी व्यवस्था उभी केली की, जर आशय विसरुन प्रतिक्रिया द्यायला लागलो तर एक प्रकारे त्या महान लोकांनी केलेल्या कार्यावरही आपण प्रश्नचिन्ह उभा करु, असंही फडणवीस म्हणाले.
सीमावादावर काय म्हणाले फडणवीस?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक त्यांची भूमिका बदलणार नाही आपणही आपली भूमिका बदलणार नाही. त्यामुळं यातून एकतर चर्चेतून मार्ग निघेल किंवा सुप्रीम कोर्टात मार्ग निघेल. कारण गेल्या साठ वर्षात त्यांनी भूमिका बदलेली नाही आणि आपणही भूमिका बदलेली नाही. महाराष्ट्राची बाजू कर्नाटपेक्षा भक्कम आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टात ते त्यांची बाजू मांडतील आणि आपण आपली बाजू मांडू. आम्ही बाजू मांडतोय कारण आपली बाजू भक्कम आहे, असंही देवेद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.