Devendra Fadnavis : इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट; गृहमंत्री अमित शहाही घटनेवर लक्ष ठेवून

रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली.
Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslideesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलीये.

Khalapur Irshalwadi Landslide : रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरशाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या दरडीच्या मलब्याखाली 40 घरं दबली गेली आहेत.

Khalapur Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslide : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; CM शिंदेंची मोठी घोषणा

आतापर्यंत घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलीये.

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide: हेलिकॉप्टर तयार, पण.... ; CM एकनाथ शिंदेंनी सांगितली बचावकार्यातील आव्हानं

या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 75 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटव्दारे दिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटलंय की, रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळगड इथं दरड कोसळण्याची घटना बुधवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला.

त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळं मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीनं होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकूण 48 कुटुंब इथं आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जखमींवर तातडीनं उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल, तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्यानं लक्ष ठेवून आहोत, असंही फडणवीसांनी म्‍हटलंय.

Khalapur Irshalwadi Landslide
Kolhapur : आईचा टाहो, थिजलेला बाप अन् हादरलेलं शहर; आईसमोरच बसखाली सापडून पोटचा गोळा ठार

'केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुर्घटनेवर लक्ष ठेवून'

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळं बचावकार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामान चांगलं झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडी आरएफ टीम काम करीत आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू आहे. आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.