फडणवीसांच्या काळातील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्यावर काळेंचा 'खुलासा'

Sanjay Raut vs Devendra Fadnavis
Sanjay Raut vs Devendra Fadnavis esakal
Updated on
Summary

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 25 हजार कोटींचा महाघोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केलाय.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis Government) काळात २५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या घोटाळ्यात अमोल काळे (Amol Kale) आणि विजय ढवंगाळे हे मुख्य सूत्रधार असल्याचंही राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलं होतं. तेव्हापासून अमोल काळे आणि विजय ढवंगाळे या दोन्ही नावांची प्रचंड चर्चा रंगलीय. मात्र, या आरोपावर खुद्द अमोल काळे यांनी मोठा खुलासा केलाय.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमोल काळे म्हणाले, महाराष्ट्र शासनाचं (Maharastra Government) कोणतंही कंत्राट मी घेतलेलं नाही. माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे. जो कोणी माझी बदनामी करत आहे, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. तसेच मी एक खासगी व्यावसायिक आहे. राऊत म्हंटल्याप्रमाणं मी कुठंही परदेशात पळून गेलेलो नाही. माझ्याबाबत फक्त संभ्रम निर्माण केला जातोय. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (Mumbai Cricket Association) उपाध्यक्ष आहे, त्यामुळं कोणतंही कंत्राट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं स्पष्ट करत काळेंनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Raut vs Devendra Fadnavis
'माझ्या कुटुंबानं पक्षासाठी रक्त सांडलंय, मी कदापि काँग्रेस सोडणार नाही'

संजय राऊतांनी काय आरोप केले होते?

राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारनं महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली होती. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा खासदार राऊत यांनी केली होती. पाच हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आलेला आहे. याबाबतची सगळी माहिती मी संबंधित तपास यंत्रणांकडे देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच अमोल काळे हा कोण आहे, याचा खुलासा भाजपनं करावा. अन्यथा आम्ही त्याला समोर आणू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.