Devendra Fadnavis : ग्रीन एनर्जीमध्ये २ लाख ७६ हजार कोटींची विक्रमी करार; फडणवीसांनी दिली माहिती

Devendra Fadnavis News : ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास २ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार करण्यात आले आहेत अशी माहितील राज्याते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

Devendra Fadnavis On Green Hydrogen Energy News : महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही महत्वाच्या सामजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास २ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे करार करण्यात आले आहेत अशी माहितील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या करारांबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले की, या करारांमध्ये एनटीपीसी ग्रीन एनर्जी ८० हजार कोटी, आव्हाडा ग्रीन हायड्रोजन ५० हजार कोटी, रीन्यू ग्रीन फ्यूअल्स ६६ हजार कोटी, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स २५ हजार कोटी, एल अँड टी ग्रीन टेक १० हजार कोटी, जेएसडब्लू ग्रीन हायड्रोजन १५ हजार कोटी, वेल्समन गोदावरी जीएस टू २९ हजार कोटी असे २ लाख ७६ हजार ७०० कोटी रुपयांचे हे करार आहेत. तसेच या करारांमधून तब्बल ६३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis
Ajit Pawar: भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'राज्याचे प्रमुख म्हणून शिंदेचा निर्णय...'

या करारांमुळे महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये आग्रणी होणार आहे. हे करार करणाऱ्या कंपन्या देशातील अग्रणी कंपन्या आहेत. महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमध्ये धोरण तयार करणार पहिलं राज्य ठरलं आहे. त्यामुळ ही गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे असेही फडणवीस म्हणाले.

आर्सेलर मित्तल निपॉन स्टील जी जगातील सर्वात मोटी स्टील कंपनी आहे यांच्यासोबत आपण सहा मिलीयन टनच्या स्टील प्लँटचा सामंजस्य करार आपण केला आहे. यामुळे तब्बल ७० हजार कोटींची गुंतवणूक स्टीलमध्ये येणार आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis
Ramayana to be taught at Madrassas: आता मदरशांमध्ये दिले जाणार रामायणाचे धडे! वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()