Shivsena vardhapan din 2023 : फडणवीस म्हणजे, हास्यजत्रेचा प्रयोग! मोदींनी लस तयार केल्याच्या दाव्याची ठाकरेंनी उवडली खिल्ली

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Updated on

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत शिवसेनेचा ५७वा वर्धापन दिनाचा सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करताना त्यांची खिल्ली देखील उडवली.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Mumbai News : गर्दीचा उच्चांक! एसी लोकलचे दरवाजे बंद होता होईना!

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जीवंत असल्याचं म्हटलं होतं. तसेच अनेक देश आम्ही मोदींमुळेच जिवंत असल्याचं म्हणतात, असा दावा करताना मोदींनीच लस तयार केल्यामुळे कोट्यवधी लोक जीवंत असल्याचं म्हटलं होतं. (Latest Marathi News)

यावरून ठाकरे यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज हस्यजत्रेचा प्रयोग झाला. मात्र काल फडणवीसांचा एक प्रयोग झाला. यावेळी उध्दव यांनी फडणवीसांच्या भाषणाची क्लिप उपस्थितांना ऐकवली. त्यात फडणवीस म्हणतात, मोदीजींनी कोविडची लस तयार केल्यामुळे आपण सगळे येथे येऊ शकलो. ही क्लिप लावल्यानंतर एकच हशा पिकला. (Marathi Tajya Batmya)

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Pankaja-Dhananjay : भाऊ-बहिणीच्या नात्याचं नवं पर्व; पंकजांसाठी धनंजय मुंडे एक पाऊल मागे, भविष्यात...

ठाकरे म्हणाले, यांच्या डोक्यात कोणता व्हायरस घुसला काय कळत नाही. मोदींनी लस बनवली तर संशोधक का गवत उपटत होते का? या अंधभक्तांनाच लस देण्याची गरज असून यांना समीर चौगुलेंच्या दवाखान्यात समुपदेशनासाठी पाठवले पाहिजे. हे सगळे अवली आहेत, लवली कोणीच नाही. पण यांनी लक्षात ठेवावं तुम्ही अवली असेल तरी जनता कावली आहे. तुम्ही आमची झोप उवडली. सगळेचं पळवली. अशा वातावरणात आपल्याला पुढं जायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.