देवेंद्र फडणवीस म्हणाले, टिका करताना भाषेचे भान राखले पाहिजे

Language awareness should be maintained while criticizing
Language awareness should be maintained while criticizingLanguage awareness should be maintained while criticizing
Updated on

कोल्हापूर : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. तिचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला. टिका करताना भाषेचे भानं राखले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. (Language awareness should be maintained while criticizing)

केतकी चितळे (Ketki Chitale) ही अधूनमधून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच आक्षेपार्ह शब्दात टिका केली. केतकीने फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली. ॲड. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट आहे. ही पोस्ट तिने आपल्या वॉलवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली आहे. यामध्ये ‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक’ असे शब्द वापरण्यात आले आहेत.

Language awareness should be maintained while criticizing
एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह कुटुंबीयांना जाळले; स्वतः केली आत्महत्या

नुकतीच शरद पवारांनी साताऱ्यात कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली होती. कष्टकऱ्यांची व्यथा सांगणाऱ्या कवितेत हिंदू देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केले होते. शरद पवारांनी देवी-देवतांचे बाप काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर केतकीने शरद पवारांवर (sharad pawar) आक्षेपार्ह भाषेत टिका केली आहे. या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर तिच्या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळेच तिच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या पोस्टचा विरोध केला. कोणाविरुद्ध टिका करताना आपण काय भाषा वापरतो याचे आपल्याला भान असले पाहिजे. आजकाल सोशल मीडियावर बेताल बोललं जात आहे. खालच्या दर्जाचे शब्द वापरले जात आहे. हे योग्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

चित्रा वाघ यांनी केला विरोध

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या विधानाचा भाजकडूनही विरोध होत आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘केतकी चितळेसारख्या प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला व संस्कृतीला नक्कीच गालबोट आहेत.. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर काहीही बोललं जाणार असेल, तर ते खपवून घेण्याचा प्रश्नच नाही.. पोलीसांनी योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून अशी विकृत भाषा वापरण्यासाठी कोणीही धजावणार नाही..’ असे ट्विट करून चित्रा वाघ यांनी विरोध दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.