Devendra Fadnavis : अजित पवार उपमुख्यमंत्री, फडणवीसांना केंद्रात संधी? 

राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जातील...
devendra fadnavis maharashtra bjp amit shah narendra modi government minister
devendra fadnavis maharashtra bjp amit shah narendra modi government ministersakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीन डझन आमदार फोडून, या पक्षाचे नेते अजित पवार यांना सत्तेत तेही उपमुख्यमंत्रिपदावर बसविल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्राच्या राजकारणात जाण्याची चर्चा असली; तरीही प्रत्यक्षात मात्र, फडणवीस हे राज्याच्याच राजकारणात राहणार आहेत.

राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवे उपमुख्यमंत्री पवार यांना मोकळे रान मिळेल, हे हेरून असलेले फडणवीस हे केंद्रात न जाता राज्यातच आपली राजकीय मांड अधिक पक्की करतील. दरम्यान, या चर्चेवर फडणवीस किंवा भाजपच्या अन्य नेत्यांना प्रतिक्रिया दिली नाही.

सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडे (शिंदे गट) बहुमत असतानाही या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घेत, भाजपने पवार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर आमदारांना मंत्रिपद दिले आहे. परंतु, फडणवीस हे उपमुख्यमंत्री असूनही दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून पवार यांनी शपथ घेतली.

devendra fadnavis maharashtra bjp amit shah narendra modi government minister
Ajit Pawar NCP : महाराष्ट्रच नव्हे तर देशात गाजलेला पहिला बंड शरद पवारांचा

राज्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जातील, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांना स्थान मिळेल, असा अंदाजही बांधला गेला.

पण, पक्ष संघटना, सरकार आणि प्रशासनावर पकड ठेवलेले फडणवीस यांचीही केंद्राऐवजी राज्यात काम करण्याला पसंती असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तूर्त तरी फडणवीस यांचे प्रमोशन होणार नसून, ते या सरकारमध्ये मजबुतीने काम करतील. ज्यामुळे पुढील निवडणुकांत भाजपला फायदा होण्याची आशा आहे.

devendra fadnavis maharashtra bjp amit shah narendra modi government minister
Ajit Pawar NCP News: ''हे होणारच होतं! काहीही करा यंदा भाजपा आपटणारच!'' काँग्रेसचा मोठा दावा

शिंदे, पवारांना रोखण्याची रणनीती
दुसरीकडे तीन पक्षांच्या सरकारमध्ये आपापली पक्षसंघटना वाढविण्याची स्पर्धा होणार आहे. त्यात शिंदे आणि नवे उपमुख्यमंत्री पवार यांना फायदा होऊ नये, याची रणनीती भाजप, त्यातही फडणवीस यांचीही राहणार आहे. भाजपमध्ये आजघडीला फडणवीस यांना मानणाऱ्या मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.