Devendra Fadnavis : भाजपचा मिशन १५२चा नारा! फडणवीसांचे विधान शिंदे-अजित पवारांचं टेन्शन वाढवणारे

AJit pawar, devendra Fadnavis and Eknath shinde
AJit pawar, devendra Fadnavis and Eknath shinde
Updated on

मुंबई - राज्याच्या राजकारणात भूकंप घडवत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड घडवून आणलं. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून सर्वांनाच धक्का दिला. त्याचवेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचं काय असा प्रश्नही उपस्थित झाला. मात्र देवेंद्र फडणवीसांनी २०२४ विधानसभेसाठी ठेवलेलं लक्ष्य अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं टेन्शन वाढवणारे आहे.

AJit pawar, devendra Fadnavis and Eknath shinde
Ajit Pawar : आव्हाडांना आम्लपित्ताच्या गोळ्यांची गरज; अजित पवार गटाची खोचक टीका

फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना चौफेर फटकेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीबाबात फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले की, शिवसेनेसोबत आमची इमोशनल युती आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत पॉलिटीकल युती आहे.

यावेळी फडणवीसांनी पक्ष फोडल्याचे आणि घर फोडल्याच्या आरोपांवर आपली भूमिका मांडली. २०१९ मध्ये जनादेशाची हत्या करण्याचं काम कोणी केलं, असा सवाल फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार मोहिनी टाकल्याने आपल्यासोबत आले नाही. ज्या-ज्यावेळी अन्याय होईल, तेव्हा एकनाथ शिंदे जन्माला येईल, असंही फडणवीस म्हणाले.

AJit pawar, devendra Fadnavis and Eknath shinde
Maharashtra BJP Meeting: "मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत जावं लागलं कारण..." फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

यावेळी फडणवीस यांनी मिशन १५२ चा नारा दिला. अर्थात भाजपला १५२ जागा जिंकायच्या असतील, तर किमान २०० हून अधिक जागा लढवाव्या लागतील. याआधी २०१९ मध्ये भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये ५९ जागांवर पराभव झाला होता. अर्थात भाजपने २०० हून अधिक जागा लढवल्यास अजित पवार गट आणि शिंदे गटाला जेमतेम जागा लढवायला मिळतील, हे स्पष्ट आहे.

एकूणच भाजपच्या मिशन १५२ मुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप बेईमान नाही, सोबत आलेल्यांना सांभाळण्याची आमच्यात कुवत असल्याचं म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.