Devendra Fadnavis: फडणवीसांनी आता सोज्वळपणा सोडावा - बावनकुळे

फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये वैयक्तिक टिका-टिपण्णी सुरु झाली आहे.
Fadnavis_Bavankule
Fadnavis_Bavankule
Updated on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद उफाळून आला असून दोघांकडून एकमेकांवर वैयक्तिक टिका टिपण्णी सुरु झाली आहे. या टीकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांना आता सोज्वळपणा सोडण्याची विनंती केली आहे.

Fadnavis_Bavankule
PM Modi USA Visit : "AI हेच फ्युचर"; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर हरदीपसिंग पुरींचं महत्वाच विधान

बावनकुळे म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांबाबत काही बोललेलं आम्ही सहन करणार नाही, हे राज्य सहन करणार नाही. आज राज्यानं देवेंद्र फडणवीसांना मान्यता दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि त्यांच्याबद्दल काहीही बोलले हे आम्हाला मान्य नाही. आता आम्हाला फडणवीसांना विनंती करावी लागेल की आता तुमचा सोज्वळपणा सोडा, तुमचे जे संस्कार आहेत ते तुम्हाला सोडावे लागतील. कारण व्यक्तिगत जीवनातील परिवाराबद्दल टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही" (Marathi Tajya Batmya)

व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण असा प्रयत्न जर कोणी वारंवार करत असेल तर आम्हाला तो प्रयत्न हाणून पाडावा लागेल, असा इशाराही यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. (Latest Marathi News)

Fadnavis_Bavankule
Shantabai Kopargaokar: तमाशा कलावंताच्या बिकट स्थितीची महिला आयोगाकडून दखल; दिले 'हे' निर्देश

वाद नेमका काय?

आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधीपक्ष एकवटले आहेत. त्यांची संयुक्त बैठक २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं अर्थात खुद्द ठाकरेंनी हजेरी लावली. बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शेजारीच पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती या बसलेल्या दिसून आल्या. यावरुन देवेंद्र फडणीस यांनी ठाकरेंवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मुफ्ती यांच्या बाजुला जाऊन बसले"

फडणवीसांच्या या कडवट टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना आणखी कडवट भाषा वापरली. ते म्हणाले, "देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवरुन येऊन टीका करु नका कुटुंब तुम्हाला देखील आहे. आम्ही अजून त्यावर बोललेलो नाही. आमच्याकडं व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत हे लक्षात ठेवा. जर कुटुंबावर आलात तर शवासन करावं लागेल हे लक्षात ठेवा"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.