Devendra Fadnavis : "माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील"

मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं
Devendra Fadnavis
Devendra FadnavisEsakal
Updated on

मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्यातील लांबणीवर पडलेल्या पालिका निवडणुका होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या निवडणूक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे. एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते.  (Marathi Tajya Batmya)

यावेळी बोलताना फडणवीसांनी 'आम्ही लांबवल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत, असा आरोप देखील फडणवीसांनी केला आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Ajit Pawar Latest News : शरद पवारांवर गुगली? काल पाठिंबा देणारा आमदार आज देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीला

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

"आमच्यामुळे निवडणुका लांबल्या नाहीत. निवडणुका पार पडाव्या असं आम्हालाही वाटतं. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने न्यायालयात भरपूर याचिका दाखल केल्यात, आरक्षणासंदर्भातील एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या करून स्टेटस को दिला आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Praful Patel Latest Statement : 'शिंदे गुवाहाटीला असताना आम्ही भाजपसोबत जाणार होतो पण...', प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

या स्टेटस कोमुळेच निवडणुका होऊ शकल्या नाहीत. स्टेटस को हटवला जाईल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील असंही ते म्हणालेत. तर उद्धवजी बोलतात की, तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्यात, त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी ते का बोलतात? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील", असंही ते पुढे म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.