Devendra Fadnavis : तर तुम्ही माझं लग्न थांबवलं असतं ना…; विदर्भाच्या मुद्यावर फडणवीस-खडसेंमध्ये जुंपली

devendra fadnavis on eknath khadse alligation over sepration of vidarbha and marriage claim in winter session
devendra fadnavis on eknath khadse alligation over sepration of vidarbha and marriage claim in winter session
Updated on

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे विदर्भाच्या प्रश्नावर समोरा-समोर आल्याचे पाहायला मिळालं.

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेची आठवण खडसे यांनी करून दिली, यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना चोख प्रत्त्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. तर तुम्ही माझं लग्न थांबवलं असतं ना असे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी घोषणा केली होती त्याचं काय झालं? असा थेट प्रश्न केला. या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, "नाथा भाऊंनी एक शोध लावला आहे. नाथा भाऊ माझ्या लग्नात तुम्ही होते ना, असं काय करतात. मी अशी घोषणा कधीच केली नाही. नाहीतर तुम्हीच थांबवलं असतं, लग्न करू नको म्हणून".

फडणवीस पुढे म्हणले की, एक जागा दाखवा जेथे मी घोषणा केली, वृत्तपत्रात काहीही छापतात त्यावर विश्वास ठेवत जाऊ नका आपण अशाचं घोषणा करतो ज्या आपल्याला करता येतात असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खडसे काय म्हणाले होते?

आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही करणार, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मग या महाराष्ट्रात विदर्भ आहे की नाही असे एकनाथ खडसे विधानसभेत म्हणाले होते. विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही या फडणवीसांच्या भीष्मप्रतिज्ञेचे काय झाले? सत्तेत आले तर वेगळा विदर्भ विसरले का? असा सवाल त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.