Devendra Fadanvis : भगतसिंह कोश्यारींची उचलबांगडी निश्चित? फडणवीसांचे सूचक विधान

devendra fadnavis on give signals action on governor bhagat singh koshyari over udayanraje bhosale
devendra fadnavis on give signals action on governor bhagat singh koshyari over udayanraje bhosale esakal
Updated on

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील वातावरण पेटलं होतं. यानंतर आजा दयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील कारवाई का केली जात नाही असा सवाल केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या असल्याचे म्हटले आहे.

उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत. छत्रपतींचे वंशज हे कधीही हतबल होऊ शकत नाहीत, जरी भावनेतून ते बोलले असले तरी महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, शेवटी राज्यपाल हे संविधानीक पद आहे, ते सरकारच्या हाती नसतं. राज्यपालांच्या नियुक्तीचे आधिकार राष्ट्रपतींकडे असतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही, उदयनराजे ते समजून घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही सगळे ठामपणे आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत दुसरा कोणी असू शकत नाहीत असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रपती या प्रकरणी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून पायउतार होण्याचे आदेश देतील का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

devendra fadnavis on give signals action on governor bhagat singh koshyari over udayanraje bhosale
Udayanraje Bhosale : डोळे पाणावल्यानं उदयनराजे हतबल? खासदारकी सोडण्याबाबत केलं महत्वाचं विधान

काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवाजी महाराजांबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचे नाकारले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच असतील.

कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

devendra fadnavis on give signals action on governor bhagat singh koshyari over udayanraje bhosale
Supriya Sule : पुण्याच्या विश्वविक्रमी ऋतुराजचं सुप्रिया सुळेंनीही केलं कौतुक; ट्विट करून म्हणाल्या…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.