Devendra Fadnavis : अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणणाऱ्या पडळकरांवर फडणवीसांचं भाष्य; म्हणाले...

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या मुद्द्यावर अजित पवार गट आक्रमक झाला असून यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेमकं झालं काय

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवारांवर जहरी टीका केली. यामुळे भाजप आणि अजित पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाले. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis
Justin Trudeau : कॅनेडाचे पंतप्रधान ट्रूडोंच्या वक्तव्यानंतर काही तासांतच खलिस्तानी सक्रिय! भारताविरुद्ध रचला मोठा कट

पडळकर काय म्हणाले होते?

त्यांची (अजित पवार) भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि या पुढंही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे, असे पडळकर म्हणाले.

Devendra Fadnavis
Samvidhan Sadan: जुन्या संसदेचं नवं नामकरण! 'संविधान सदन' म्हणून मिळणार नवी ओळख; PM मोदींची सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.