Devendra Fadnavis : ''निखिल वागळेंना पोलिसांनी आधीच सांगितलं होतं...'' देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis on Nikhil Wagle : पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पु्ण्यामध्ये झालेल्या हल्ल्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये वागळे यांची कशी चूक होती, याबाबत फडणवीस बोलले आहेत. 'निर्भय बनो सभा' या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

Devendra Fadnavis on Nikhil Wagle (Marathi News) : पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर पु्ण्यामध्ये झालेल्या हल्ल्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये वागळे यांची कशी चूक होती, याबाबत फडणवीस बोलले आहेत. 'निर्भय बनो सभा' या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती.

निखिल वागळेंवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत चुकीचं बोलणं योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आलेला नसून वागळे यांना पोलिसांनी आधीच सांगितल होतं की, आम्ही पुण्यातील रस्ता क्लिअर करतो मग तुम्ही जा. परंतु निखिल वागळे यांनी ऐकलं नाही. त्यांच्या संरक्षणासाठी साध्या ड्रेसमधील लोकदेखील होते, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis
Reliance-Disney Merger : तब्बल 70,352 कोटी! रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणामुळे भारतीय क्रिकेटचं गणितच बदलणार?

विकासकामांच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने पहिला नंबर पटकवला आहे. १ लाख ९ हजार कोटी गुंतवणूक आणि राज्यासाठी आलेली एक लाख कोटींची गुंतवणूक मोठी आहे.

''शेतकऱ्याला 12 तास वीज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था आपण करत आहोत. यासाठी एक मॉडेल तयार केलं आहे. आपण आता शेतकऱ्याला वीज देताना ती सात रुपये प्रति युनिट खर्च येतो. या मॉडेलमुळे खर्च कमी होईल. यासह पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री सोलार योजना आणली आहे. त्या माध्यमातून 300 युनिट प्रमाणे वीज मोफत मिळणार आहे.''

Devendra Fadnavis
The Indrani Mukerjea Story Review: असा 'डॉक्युड्रामा' यापूर्वी कधीही पाहिला नसेल, वेगवेगळी 'रहस्यं' तुम्हाला देतील धक्का!

गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, गणपत गायकवाड प्रकरणाचा वाद जमिनीचा आहे. अभिषेक घोसाळकर यांची घटना देखील गंभीर आहे. या घटनेला इतरही एँगल आहेत. घोसाळकर यांची हत्या दुर्दैवी आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली आहे. फेसबुक लाईव्ह करताना ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीचा अंगरक्षक अमरिंदर कुमार याला अटक केली आहे. त्याची पिस्तुल लायसन असणारी होती, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()