Devendra Fadnavis : गुजरात-कर्नाटक नव्हे तर परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर एकवर; फडणवीसांचा मोठा दावा!

Devendra Fadnavis on pump storage project  investment and clarification on FDI in Maharashtra
Devendra Fadnavis on pump storage project investment and clarification on FDI in Maharashtra
Updated on

राज्य सरकारने अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात दोन बड्या कंपन्यांसोबत एक मोठा करार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबद्दल माहिती दिली आहे. यासबोतच महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीत पुन्हा नंबर एकवर आला आहे, आता विरोधकांनी तोंडं बंद केली पाहिजेत अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

फडणवीसांनी गुतवणूक कराराबद्दल माहिती देताना सांगितले की, आज महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रोजेक्ट (PSP)च्या संदर्भात १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केंद्र सरकारची एनएचपीसी आणि खाजगी क्षेत्रातील टॉरेंट पावर या दोन कंपन्यांशी केले आहेत. तसेच यातून जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणुक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis on pump storage project  investment and clarification on FDI in Maharashtra
Sharad Pawar : शिवछत्रपतींनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही, तर…; पवारांनी संभाजी ब्रिगेडच्या सोहळ्यात व्यक्त केली भावना

पंप स्टोरेज प्रोजेक्ट काय आहे?

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने वारंवार आपल्याला सांगितलं, तसेच जगभरात रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात पंप स्टोरेज ही अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे. ज्यामध्ये खालच्या जलाशयातून दिवसा सोलरच्या माध्यमातून पाणी उचललं जातं आणि वरच्या जलाशयात सोडलं जातं आणि रात्री वरच्या झलाशयातून ते पाणी खाली आणून टर्बाइनच्या माध्यमातून विजनिर्मीती केली जाते. यामुळे २४ तास आपल्याला पारंपारिक उर्जा कमी किंमतीत मिळते असे फडणवीस म्हणाले.

ग्रीड स्टॅबिलाइज करण्यासाठी ही वीज एका मिनीटात सुरू करता येते आणि आवश्यकता नसल्यास ती लगेच बॅकडाऊन देखील करता येते, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राने आज केलेले करार ऐतिहासिक आहेत. इतकी गुंतवणुक कुठेही आली नाहीये.

Devendra Fadnavis on pump storage project  investment and clarification on FDI in Maharashtra
Wrestlers Protest : कुस्तीपटू आंदोलन प्रकरणी कारवाईला वेग! ब्रिजभूषण सिंग यांच्या घरी धडकले दिल्ली पोलिस

परदेश गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिला..

महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणुक येत आहे. कालच एफडीआयचे आकडे जाहीर झाले आहेत. २०२०-२१ मध्ये गुजरात एक नंबरवर होता, २०२१-२२ मध्ये कर्नाटक एक नंबरवर होतं. आता आमचं सरकार आलं आहे ,आता महाराष्ट्राला नंबर एक वर नेऊ. आता डीआयपीपीने आकडे घोषित केल्यानंतर एफडीआयमध्ये पहिल्या क्रमांकवर महाराष्ट्रच आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर उद्योग इकडे-तिकेडे गेले असं म्हणत होते आता तरी त्यांची तोंड बंद केली पाहिजेत असेही फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.