Maharashtra Politics: आमचा एकत्रित प्रवास हा 25 वर्षाचा...जाहिरात वादावर फडणवीसांनी सोडले मौन

फडणवीस यांनी एका वाक्यात दोघांच्यात आलबेल असल्याचे स्पष्ट केलं.
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Updated on

राज्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलेच रणकंदन माजलं होत. दरम्यान, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस एकत्र व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे या जाहिराती प्रकरणावर फडणवीस यांनी मौन बाळगल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे वेधले होते. मात्र, यावेळी फडणवीस यांनी एका वाक्यात दोघांच्यात आलबेल असल्याचे स्पष्ट केलं. devendra fadnavis on shinde group advertisement controversy

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यावेळी जनतेला संबोधित करताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला. मागचं सरकारं घरी बसलं होतं हे सरकार तुमच्या दारी आलयं. असा टोला ठाकरेंना लगावला. हे सरकार लाखो लोकांपर्यंत पोहचलं आहे. देशातील वितरण व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली. (Latest Marathi News)

आमचा एकत्रित प्रवास हा 25 वर्षाचा आहे आणि आता ते घट्ट झालं आहे. आम्ही नेहमी एकत्र राहणार. जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. आमच्या एकत्र प्रवासाची चिंता नको. कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतकं तकालतुन सरकारं नाही. (Latest Marathi News)

आमचं सरकारं मविआपेक्षा घट्ट आहे. सरकार मजबुत आहे. अस फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

काय होता वाद?

शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. आतापर्यंत 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात पाहयला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच घमासान माजले. दरम्यान, शिवसेनेकडून या जाहिरातीमध्ये बदल करण्यात आला आहे. इतकचं नव्हे तर लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.