सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीसCanva
Updated on
Summary

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे.

सोलापूर : ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते, अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली. (Devendra Fadnavis paid homage to Ganapatrao Deshmukh-ssd73)

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले, अभ्यासू, संयमी व विशेषतः 'जनसामान्यातील माणूस' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने "जनसामान्यांचा लोकनेता" हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासुन सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. आज शुक्रवार (ता. 30) रोजी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()