फडणवीस प्रकरणी भाजप आक्रमक; भुजबळ म्हणाले ही तर गोबेल्स नीति...

प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायच हे भाजपने ठरवले
Chhagan Bhujbal vs Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal vs Devendra Fadnavisesakal
Updated on

फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणावरून भाजप (BJP) कार्यकर्ते आज राज्यभर आक्रमक झाले आहेत. यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने आक्रमक व्हायची काही गरज नाही आता फक्त चौकशी सुरु आहे. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असल्याने या पदाला एक दर्जा आहे. त्यामुळे पोलिस घरी जाऊन चौकशी करत आहेत. ईडी (ED) चौकशी न करता उचलून घेऊन जाते तेव्हा तुम्ही काय बोलत नाही. आता फक्त फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी होतेयं कारवाई नाही. प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायच हे भाजपने ठरवले आहे. त्यांची ही गोबेल्स नीति असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. आज त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.

कोणत्या ना कोणत्या प्रकरणावरून भाजप सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी महाविकास आघाडी नेमकी कशी तयारी करत आहे या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, त्रास देणे, अटक करणे, ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स कारवाई करणे याचा पूरेपूर उपयोग भाजप करत आहे. मात्र, जोपर्यंत शरद पवार, उध्दव ठाकरे आणि सोनिया गांधी हे सरकारच्या बाबतीमध्ये ठाम आहेत तोपर्यंत हे सरकार कोणाही पाडू शकत नाही असा सूचक इशारा यावेळी त्यांनी भाजपला दिला.

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप करत आहे याविषयी भुजबळ म्हणाले, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही राजीनामा घेऊन अजून त्यांच्यावर अन्याय करणार नाही. कोर्टात पुरावे सादर होऊ देत. ते मुस्लिम आहेत म्हणून ईडी ५५ चे ५ लाख करते, त्यांचा ५ लाखाचा व्यवहार घेऊन दाऊदशी संबंध जोडला जात आहे. पाच लाख तर ते पान खाऊन थुकतात. दाऊद प्रकरणाला ३० वर्षे झाली. हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले. या प्रकरणात काही लोकांनी फाशी झाली. काहींनी जन्मठेपेची शिक्षा झाली. कोठेही मलिकांचा उल्लेख नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Summary

दाऊद प्रकरणाला ३० वर्षे झाली. हजारो पानांचे चार्टशीट तयार झाले. या प्रकरणात काही लोकांनी फाशी झाली. काहींनी जन्मठेपेची शिक्षा झाली. कोठेही मलिकांचा उल्लेख नाही

भाजप खोटे बोलतात पण रेटून बोलतात. एकच गोष्ट ते सारखे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात. ही तर गोबेल्स नीति आहे. जरी चार राज्यात भाजपाने बाजी मारली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे ५० आमदारांनी कमी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा चढता सुरज हळूहळू खाली येईल असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()