NCP Political Crisis: प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू

Praful Patel, Devendra Fadnavis : प्रफुल पटेल हे महायुतीकडे वळल्यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याधक्ष आणि विदर्भातील नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊन भाजप आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादीला देणार असल्याचे समजते.(Latest Marathi News)

विशेष म्हणजे पटेल हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. विदर्भाची जबादारी अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे आहे. भंडारा-गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना लगेच राज्यसभेवर पाठवून राष्ट्रवादीने त्यांना मानाचे स्थान दिले होते. राष्ट्रवादीचे तब्बल ४० आमदार रविवारी महाराष्ट्रातील शिंदे सेना आणि भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar: भाजप करणार शिंदेगटाची कोंडी? CM शिंदेंच्या गटाला अजितदादांची साथ फायद्याची की तोट्याची

विरोधी पक्षनते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर ओबीसी नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आदिती या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आहे.(Latest Marathi News)

शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पटेल आणि तटकरे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र पटेल यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली नाही. राज्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपावण्यात आली आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Marathi News Live Update : अजित पवारांचं बंड आणि इतर राजकीय घडामोडी एका क्लिकवर

असे असले तरी राष्ट्रवादीतील झालेल्या बंडाची पटेल यांना माहिती होती. असे असताना त्यांनी ते रोखण्यासाठी प्रयत्न् केले नाही. त्यावरून दिल्लीतील सर्व हालचाली आणि वाटाघाटी पटेल यांनीच केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्या बदल्यात प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे समजते.(Latest Marathi News)

केंद्रात संपुआचे सरकार असताना प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उद्दयण मंत्री होते. नागपूरच्या मिहान प्रकल्पला नागपूर विमानतळ त्यांनीच हस्तांतरात त्यांची मोठी भूमिका होती.

Ajit Pawar
Ajit Pawar: भाजप करणार शिंदेगटाची कोंडी? CM शिंदेंच्या गटाला अजितदादांची साथ फायद्याची की तोट्याची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.