Devendra Fadnavis: "त्यासाठी वाट पाहू नका, मैदानात उतरा अन् ठोकून काढा," शहांसमोरच फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कोणता आदेश?

Amit Shah Pune: लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Devendra Fadnavis Pune BJP Session
Devendra Fadnavis Pune BJP SessionEsakal
Updated on

सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सभांसह अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा भाजपच्या अधिवेशनात उपस्थित आहेत.

या अधिवेशनात बोलताना महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे खोटे नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी जोरदार बॅटिंग करत विरोधकांना ठोकून काढण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाला विरोधकांचे फेक नरेटीव्ह जबाबदार असल्याचा आरोप एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सातत्याने करत आहेत. आज भाजपच्या महाअधिवेशनातही फडणवीस यांनी फेक नरेटीव्हचा पुन्हा उल्लेख करत विरोधकांवर हल्ला केला.

फडणवीस म्हणाले, "विरोधक आज मोठ्या प्रमाणात फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. त्यांच्या या फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर द्या. आपले आमचे लोक प्रतिनिधी सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. त्यामुळे फेक नरेटीव्ह तयार होतो पण आपले लोक उत्तर देत नाही. आपले लोक विरोधकांना उत्तर देत नाही आणि आदेशाची वाट पाहत बसतात. त्यामुळे आज मी सर्वांना आदेश देतो की, तुम्ही फुल बॅटिंग करा आणि मैदानात उतरून विरोधकांना ठोकूण काढा. यासाठी आदेशाची वाट पाहत बसू नका. असे करताना एक लक्षात ठेवा की, तुम्ही हीट विकेट होऊ नका."

लाडकी बहिण

दरम्यान सध्या राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विधानसभेत विरोधक या योजनेला विरोध करत होते आणि आता आपआपल्या मतदारसंघात स्वत:चे फोटो लावून या योजनेसाठी महिलांचे फॉर्म भरून घेत आहेत. असे असले तरी याचा काहीही फरक पडणार नाही. कारण ज्यादिवशी ही योजना आणली त्यादिवशीच आपली मते लाखोंनी वाढली आहेत.

दरम्यान येणारी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने गांभीर्याने घेतली आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जबरदस्त फटका बसला आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पावर यांना बरोबर घेतही भाजपला मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वेळी तब्बल 23 जागा जिंकणारी भाजप यंदा अवघ्या 9 जागांवर घसरली आहे.

यामुळे विधानसबा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यात लक्ष घातल्याचे दिसत आहे. कारण गेल्या काही महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुंबईचे दौरे करत आहेत. अशात आज गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात उपस्थिती लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.