राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) चे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज ईडी(ED) कडून अटक केल्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंत 8 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मत व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार खोटे साक्षीदार कसे उभे करतात, याबाबत मोठी खुलासा लवकरच करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगीतले
सरकारी यंत्रणा खोटेपणा करुन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही यांचा बुरखा फाडू, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावर बोलतील असे फडणवीस म्हणाले.पुढे बोलताना नवाब मलिक यांना ईडीकडून करण्यात आलेली अटक हे राजकीय प्रकरण नसून अत्यंत ही अत्यंत गंभीर बाब आहे. जमीन धमकी देऊन विकत घेऊन पैसे देशाच्या शत्रूंना दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फडणवीस नवाब मलिक मनी लॉंड्रिंग प्रकरणावर बोलताना म्हणाले की, मंत्री राहीलेल्या नेत्यांने मुंबई बॉमस्फोटात सहभागी आरोपीकडून जमीन घेण्याचं कारण काय? या व्यवहारातून दाऊदला पैसा मिळाला. तसेच या व्यवहारानंतर मुंबईवर तीन वेळा हल्ले झाले आहेत. जे लोक मुंबईत बॉमस्फोट करतात त्यांना आपल्या व्यवहारातून पेसे देणार असाल तर हे निंदणीय आहे, म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे.
जमीन अंडरवल्डच्या मदतीने कशी मिळाली आणि हे हजारो कोटी हसीना पारकर आणि दाऊदला मिळाले. ईडीने आरोपीचे जवाब घेतले असून, ज्यांच्यासमोर व्यवहार झाला त्यांचे जवाब देखील घेण्यात आले आहेत, ही कारवाई नियमाने केली आहे, याचा टेरर फंडींगचा अँगल स्पष्ट दिसतोय असे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, जमीन असलेल्या महिलेने ईडीला त्यात एक पैसाही मिळाला नसल्याचे सांगितले. चुकीचे सांगून त्याच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेण्यात आली आणि नंतर त्याला धमकावण्यात आले.
हे गंभीर आहे, त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता याचा निषेधच केला पाहिजे, दाऊदच्या विरोधात सगळ्यांनी भुमिका मांडली पाहीजे. ही सर्व समोर आल्यानंतर नवाब मलिक यांना ईडी कोर्टात 3 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
कोणी देशाच्या शत्रुसोबत व्यवहार करत असेल, तर कारवाई झालीच पाहीजे, या व्यवहारातील पैसे सरळ हसीना पारकर आणि दाऊदला मिळत असतील, तर सगळ्यांनी याचा विरोध केला पाहिजे. सगळ्यानी एकत्रीतपणे भूमिका मांडली पाहीजे असे फडणवीस म्हणाले. हा पैसा हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदला गेला. देशाच्या शत्रू सोबत व्यवहार करण्याचं कारण काय? हा राजकारण करण्याचा विषय नाही असेही ते म्हणाले.
या प्रकरणात हजारो कोटींची जमीन केवळ तीस लाख रुपयांना खरेदी करण्यात आली. यामध्ये हसिना पारकर यांना ५५ लाख रुपये मिळाल्याचेही ईडीने सांगितले असल्याचे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, आजच्या कारवाईला राजकीय म्हणता येणार नाही, नवाब मलिकांवर जी कारवाई झाली त्याबद्दल ईडीने सत्यता कोर्टासमोर मांडली आहे. ही जमीन घेतली आहे ते मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणात जेलमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांत दाऊद ने भारतावर काही हल्ले केले, त्याचं टेरर फंडिंग भारतातून गोळा केलं. याच माझ्याकडे होते, ते सर्व कागपत्र मी ईडी, एएनआयला दिले आहेत, त्यानंतर ईडेने नऊ ठिकाणांवर छापेमारी केली त्यानंतर सर्व गोष्टी ही कारवाई करण्यात आली आहे.
मलिक यांनी राजिनामा न देण्याच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, यामुळे राजकारणाचा स्तर खाली जात असेल तर चुकीचा पायंडा पडला जात आहे. रा राजकीय प्रकरणात अटक झालेली नाही, दाऊदशी संबंधीत व्यवहार केलेल्या मंत्र्याला वाचवायला अख्खं सरकार उभं राहीलं, याने देशासमोर एक वाईट संदेश जाईल असे फडणवीस म्हणाले.
काही दिवसांत खुलासा करणार
संजय राऊत यांच्या पाठीवर वार करण्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत जसे बोलतात यांना उत्तर देणे माझ्या स्तरात बसत नाही. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार खोटे साक्षीदार कसे उभे करतात, याबाबत मोठी खुलासा लवकरच करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगीतले, सरकारी यंत्रणा खोटेपणा करुन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही यांचा बुरखा फाडू, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावर बोलतील असे फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.