rashmi shukla phone tapping case of-political leaders closure report devendra fadanvis cm eknath shinde
rashmi shukla phone tapping case of-political leaders closure report devendra fadanvis cm eknath shinde

Devendra Fadnavis: रश्मी शुक्लांच्या क्लिनचीटवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Published on

मुंबई: पुण्याची माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना एकनाथ खडसे, संजय राऊत आणि काँग्रेसनेते नाना पटोले यांचे फोन टॅपिंगप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

rashmi shukla phone tapping case of-political leaders closure report devendra fadanvis cm eknath shinde
विदर्भात संजय राठोडांना रोखण्यासाठी ठाकरेंचा 'मेगा प्लॅन'; तगडा नेता लागला गळाला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोटोकॉपी व्यतिरिक्त कोणताही पुरावा नाही. कायद्याप्रमाणे ज्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची जबाबदारी निश्चित होते, त्या अधिकारी शुक्ला नव्हत्या. फोटोकॉपी शिवाय कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याचं पोलिसांनी देखील रेकॉर्डवर ठेवलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे केवळ गुन्हेगार ठरविण्यासाठी कोणावरही खटला दाखल केला जावू शकत नाही. त्यामुळे लॉ आणि ज्युडिशरीचं अभिमत घेऊनच निर्णय घेतल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

rashmi shukla phone tapping case of-political leaders closure report devendra fadanvis cm eknath shinde
Phone Tapping Case: खडसे, संजय राऊत फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना राज्य सरकारचा मोठा दिलासा!

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात आरोपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाकडे परवानगीचे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र गृह विभागाने ही परवानगी नाकारली आहे.

आता पोलिस कोर्टात आहवाल सादर करून आरोपपत्र मागे घेणार असल्याचे समोर येत आहे. फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()