Prakash Ambedkar : ''निजामानेही बाबासाहेब आंबेडकरांना आमिष दाखवलं होतं…'', औरंगजेबच्या कबरीवरुन फडणवीस थेट बोलले

Devendra Fadnavis-Prakash Ambedkar
Devendra Fadnavis-Prakash Ambedkargoogle
Updated on

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. याभेटीचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना दिसत आहेत. अकोला येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या भेटीवर भाष्य केलं आहे.

यावेळी फडणवीसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जुनी आठवण सांगत प्रकाश आंबेडकर यांनी अनेक थेट प्रश्न देखील विचारले आहेत.

देवेंद्र फडणीस म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात असलेलं सरकार जनसामान्यांसाठी काम करत आहे, पण काही लोकं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजीनगर, अकोला कोल्हापूरला घडलं ते योगायोग नाही तर तो एक प्रयोग आहे. काही लोक अशांतता आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

अचानक औरंगजाबाचे स्टेटस कसं ठेवायला लागले. इतक्या औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या. कोणीतरी त्या पैदा करतं आहे. कारण महाराष्ट्रीतील शांतता नकोय असे फडणीस म्हणाले.

Devendra Fadnavis-Prakash Ambedkar
Maharashtra Politics : इच्छा आहे तोपर्यंतच 'मविआ'मध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले...

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मला अतिशय दुखः आहे की आमचे बाळासाहेब आंबेडकर देखील औरंगजेबाच्या कबरीवर गेले. बाळासाहेब तुमचे आमचे विचार वेगळे असतील पण तुमच्याकडं पाहाताना आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांना हैदराबादच्या निजामाने त्याकाळी मोठ्या प्रमाणात अमिषं दिली होती आणि बुध्द धम्म घेऊ नका तुम्ही आमच्यामध्ये सामिल व्हा असं सांगितलं. त्यावेळी डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलं होतं की, मी तोच धम्म स्वीकारेन जो भारताच्या भूमीमध्ये तयार झाला असेल, असे फडणीस म्हणाले.

Devendra Fadnavis-Prakash Ambedkar
Shiv Sena : 'छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?' राऊतांचा गंभीर आरोप

अरे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीत, पण औरंगजेब आमचा नेता, राजा कसा होऊ शकतो. आमचा राजा एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. भारतातील मुसलमान आहेत तेही औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेबाचं खाणदान बाहेरून आलेलं आहे. त्यामुळे देशातील राष्ट्रीय विचारांचा मुसलमान कधीच औरंगजेबाला मान्यता देत नाही. मग आज बाळासाहेब तुम्ही का तिथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करता असेही देवेंद्र फणडणीस यावेळी म्हणाले.

तुम्हा म्हणता औरंगजेबाने इतके दिवस भारतावर राज्य केलं, हिटलरने देखील जर्मनीवर राज्य केलं होतं. अनेक लोकं हिटलरला देव माणायचे पण आज हिटलरच्या कबरीवर कुत्रादेखल जात नाहीय. ही त्याच्या कबरीची आवस्था आहे. बाळासाहेब किमान तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. राज्यात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे, तेव्हा आता उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का? असा सवाल देखील फडणवीसांनी यावेळी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.