फडणवीसांची उडी फसली; संभाजीराजे प्रकरणावरुन शिवसेनेने सुनावलं!

शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणं हे भाजपाचं घाणेरडं राजकारण असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.
Shivsena Criticize Devendra Fadnavis
Shivsena Criticize Devendra FadnavisSakal
Updated on

राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी देण्यावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलंय. शिवसेनेकडून संभाजीराजेंना उमेदवारीसाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. पण त्यांनी ती नाकारत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवल्याची भावना व्यक्त केली. त्यांचेच वडील शाहू महाराजांनी त्यांना सुनावत ठाकरेंची बाजू घेतली. या सगळ्या वादात कुठेच नसलेल्या भाजपाने काल डोकं वर काढलं. आणि त्यानंतर भाजपावर शिवसेनेने टीकेची झोड उठवली आहे. (Shivsena Saamna Editorial on Devendra Fadnavis)

Shivsena Criticize Devendra Fadnavis
'सडक्या मनोवृत्तीच्या लोकांकडून शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली'

संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) प्रकरणात आत्तापर्यंत कुठेच नसणाऱ्या भाजपाने या प्रकरणात आता उडी घेतली आणि संभाजीराजेंची ठरवून कोंडी केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं. त्यावरून शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. सामना (Saamna Editorial) या मुखपत्राच्या अग्रलेखातून शिवसेना (Shivsena) म्हणते, "फडणवीसांची वक्तव्यं आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा आणि नंतर वेळ येताच तो मोडायचा हे भाजपालाच चांगले जमते. २०१४, २०१९ साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचे अनुभव गाठीशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर प्रश्न विचारतात हे आश्चर्यच आहे. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजपा नेतृत्वाने दिलेला शब्द कसा मोडला हे संपूर्ण देश जाणतो. पंचवीस वर्षांच्या युतीनंतरही शब्द मोडणाऱ्यांनी याबाबत प्रवचने झोडावीत याला काय म्हणायचे?

Shivsena Criticize Devendra Fadnavis
शाहू महाराजांनी भाजपचा मुखवटा फाडला, संजय राऊतांचा निशाणा

मी पुन्हा येईन, असं सांगणाऱ्या फडणवीसांना पुन्हा येताच आलं नाही, तेव्हापासून सुरू झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आली नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. भाजपानेच संभाजीराजेंची कोंडी करण्यास सुरुवात केली, असा दावाही सामनातून करण्यात आला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देण्याचं घाणेरडं राजकारण आहे. मात्र शाहू महाराजांनी छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही, असं परखड मत मांडल्यावर फडणवीसांचीच कोंडी झालेली दिसते. फडणवीसांनी संभाजी महाराज प्रकरणात उडी घेतली पण ती फसली हे स्पष्ट झालं, असंही सामनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.