जालना : अडीच वर्ष तुम्ही सत्तेत आहात, १२९ कोटी रुपयांचे काय केले? ना कर्तेपणामुळे पाणी देता येत नाही. तेच असे प्रश्न विचारात असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला. जालना (Jalna) येथे आज बुधवारी (ता.१५) पाण्यासाठी जल आक्रोश मोर्चाचे भाजपच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, या मोर्चानंतर सरकारला जागे व्हावे लागेल. (Devendra Fadnavis Says Government Should Work For Common Man, Otherwise They Teach Lesson)
पाणीप्रश्नावर भाजप काय उपाय करणार, सरकारकडे पैसे आहेत, असे उत्तर जालन्यातील पाणीटंचाईवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. रावसाहेब दानवे यांच्यामुळे १२९ कोटी रुपये जालन्याला मिळाले आहेत. किमान सरकार जागे झाले आणि मुख्यमंत्री औरंगाबादेत आले, अशी प्रतिक्रिया त्यांनी औरंगाबादेतील जल आक्रोश मोर्चावर दिली.
निधी आम्ही दिला. या निधीचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्य सरकारला केला. आमचे उत्तरदायित्व आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पैसे दिले. आमचे मते चोरीला गेले आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीत शिक्षा देऊ, असा इशारा दानवे यांनी शिवसेनेला दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.