मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अलर्ट केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या सुरक्षा ताफ्यात आता फोर्स वनचे १२ जवान अतिरिक्त तैनात असणार आहेत. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.