मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधाने एक मोठं विधान केलं आहे. शिवाय त्यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाचा निर्णय न घेण्यासंदर्भात सल्ला दिला.
शनिवारी बीडच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली आहे. २४ डिसेंबरचा अल्टिमेटम सरकार पाळू न शकल्याने आता पुढचं आंदोलन मुंबईत होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये आझाद मैदानावर तीन कोटी मराठे एकवटतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. आंदोलनासंदर्भातील सगळ्या सूचना त्यांनी मराठा बांधवांना दिल्या. शिवाय सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर सरकार खडबडून जागं झल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांना आंदोलनाची गरज पडणार नाही, असं आश्वस्त करणारं विधान केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करत आहे. विशेषतः मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आरक्षण प्रश्नावर काम करत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने वेगाने काम सुरु केलं आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल आलेला असून आता तिसरा अहवाल अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये असलेल्या नोंदी शोधण्याचं काम सुरु असून त्यामध्ये कुणबी नोंदी आढळून येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार या बाबतीत सकारात्मक आहे, हे दिसून येतंय.
''राज्य सरकारची सकारात्मकता बघता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय घेऊ नये. आम्ही पूर्ण शक्तीने हे कार्य करत आहोत. कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत आहोत.'' असं शेवटी फडणवीस म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.