Congress : फडणवीसांचं 'ते' विधान अन् सत्यजीत तांबेंचा अपक्ष उमदेवारी अर्ज; काँग्रेस बॅकफूटवर?

Devendra Fadnavis, Satyajeet Tambe and Balasaheb Thorat
Devendra Fadnavis, Satyajeet Tambe and Balasaheb Thorat
Updated on

Mahrashtra Politics : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरलं होतं. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेऊन एबी फॉर्म अभावी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Satyajeet Tambe news in Marathi)

Devendra Fadnavis, Satyajeet Tambe and Balasaheb Thorat
Sakshi Tanwar आणि राम कपूरचा १७ मिनिटांचा इंटिमेट सीन आजही चर्चेत; शूटच्या वेळेस अभिनेत्रीनं अनेकदा...

सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून तांबे कुटुंबाने एकप्रकारे काँग्रेसचा आदेश डावलला आहे. तर सत्यजीत तांबे खुद्द सहकार्यासाठी भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं म्हणत आहे. अर्थातच भाजपला देखील सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवार असल्यामुळे पाठिंबा देणं जड जाणार नाही. मात्र या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष बॅकफूट गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Devendra Fadnavis, Satyajeet Tambe and Balasaheb Thorat
Love Story: 2 मुलांचा बाप अन् ४ मुलांच्या आईचं भन्नाट 'लव'; सोबत व्हिडीओ बनवले अन्...

सत्यजीत यांच्या अपक्ष उमदेवारीमुळे काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक प्रकाश सोहळ्यातील विधान चर्चेत आलं आहे. फडणवीस म्हणाले होते की, सत्यजीत तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की आमची नजर त्यांच्याकडे जाते. आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे सत्यजीत भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आज त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने फडणवीसांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

Devendra Fadnavis, Satyajeet Tambe and Balasaheb Thorat
Prakash Ambedkar : ...तर आंबेडकरांची कोणासोबतही युती होणार नाही ; शिंदे गटाचा सल्ला की इशारा?

एकंदरीतच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सत्यजीत तांबे आता फडणवीसांच्या मदतीने विधान परिषदेत जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी वडिलांना उमेदवारी देणाऱ्या काँग्रेसने मुलाला ऐबी फॉर्म देणं का टाळलं, असा प्रश्नही उपस्थित होतोय.

दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहे. अस असताना देखील ऐबी फॉर्म येऊ शकला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे अन् बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्षाला सुरुवात तर झाली नाही ना, अशी शंकाही उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.