Akola Violence: महाराष्ट्रात दंगली उसळण्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...

दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
Akola Violence
Akola Violence
Updated on

अकोल्यानंतर शेवगावमध्येही जोरदार राडा झाला. अहमदनगरमधील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. या दोन घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. (devendra fadnavis statement on Akola Ahmednagar Violence )

दंगलीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Akola Violence
Ahmednagar Violence: मिरवणुकीवर दगडफेकीनंतर शेवगावमध्ये दोन गटात राडा; ४ जण जखमी

काय म्हणाले फडणवीस?

दोन्ही ठिकाणी पूर्पणे शांतता आहे. पोलीस अलर्ट मोडवर होते, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इंसिडन्स होऊ दिला नाही. जेव्हा लक्षात आलं की अशाप्रकारे काही लोक करण्याचं प्रयत्न करताहेत, सगळीकडची पोलीस कुमक त्याठिकाणी पोहोचली आणि आता पूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवू देणार नाही. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांना अद्दल घडवणार. असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

Akola Violence
Akola Violence : धार्मिक आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल झाल्याने वाद, समाजकंटकांची धरपकड; पोलिसांकडून हवेत गोळीबार

तसेच, हे १०० टक्के जाणूनबुजून होतंय. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतंय. पण ते सफल होणार नाही. अशाप्रकारे जे करातेहत त्यांना आम्ही सोडणार नाहीत”, असा सज्जड दमच फडणवीसांनी दिला आहे.

“काही संस्था, काही लोक मागून याला आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करताहेत आणि हे सगळं बाहेर आणेन. असही फडणवीस यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()