Devendra Fadanvis On Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या ब्रेक घेण्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "वेळ लागेल.."

मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये, मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात
Devendra Fadanvis On Pankaja Munde
Devendra Fadanvis On Pankaja MundeEsakal
Updated on

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आज पंकजा मुंडेंनी असं काहीही नसल्याचं सांगत पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही, असं विधान केलं आहे. पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Marathi Tajya Batmya)

''भाजपच्या 106 आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिम्मत नाही. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे, जनतेला लपून छपून काम करणाऱ्यांचा कंटाळा आला आहे'' असं म्हणत पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं स्पष्ट होतंय. (Marathi Tajya Batmya)

'माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कन्फ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Latest Marathi News)

पंकजा ताई आमच्या राष्ट्रीय सचिव आहे. त्या वरिष्ठ नेत्या आहेत. दोन महिने त्या सुट्टी घेणार आहेत. काही असेल तर त्याच्यांशी चर्चा करू. आम्ही त्याच्याशी संपर्क करू मार्ग काढू. विरोधक आमच्यात आल्याने लगेच सर्व गोष्टी काहींना रुचत नाहीत, मान्य होतं नाहीत. दोन्ही बाजूच्या नेत्यांना हे माहीत आहे. त्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत. वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील त्यांच्या भावना समजून घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadanvis On Pankaja Munde
Pankaja Munde: 'राहुल गांधींना पाहिलंही नाही, ही बातमी कोणी पसरवली', पंकजा मुडेंचा उद्विग्न सवाल

राष्ट्रवादी आमच्या सोबत आल्यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये ते स्वीकार करण्यासाठी थोडा वेळ लागेल. याआधी आमच्या पक्षातील नेत्यांचा संघर्ष राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे ते स्वीकार करायला वेळ लागेल. या सर्व गोष्टींवर चर्चेतून मार्ग सुटू शकतो. पंकजा मुंडे भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्या कायम पक्षासोबत आहेत. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील, त्यांच्या मनात काही असेल तर आम्ही जाणून घेऊ. पुढेही त्या पक्षात काम करत राहतील. त्याचबरोबर त्या चांगल्या प्रकारे नेतृत्व करत राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis On Pankaja Munde
Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवारांचे टेन्शन वाढलं...तीन शिलेदारांनी सोडली साथ ? आमदारांनी घेतली अजितदादांची भेट

दोन-तीन महिने राजकारणातून सुट्टी

माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला असल्याने मी प्रचंड कंफ्यूज आहे. मी २० वर्षांमध्ये सुट्टी घेतली नाहीये. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्यीची गरज आहे असेही पंकजा मुडे म्हणाल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)

तर राजकारणातून एक्झीट घेईल

मला एक-दोन महिन्यांच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर सांगितलं होतं, ज्या विचारधारेला समोर ठेवून मी राजकारणात आले त्यांच्याशी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातील एक्झीट घ्यायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.(Latest Marathi News)

Devendra Fadanvis On Pankaja Munde
Ajit Pawar: दिलदारपणाचं दुसरं नाव अजितदादा! शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.