devendra Fadnavis and Shraddha walker
devendra Fadnavis and Shraddha walker

Devendra Fadnavis:...तर श्रद्धाचा जीव वाचवता आला असता; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

Published on

मुंबई - दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडांने देशाला हदरवून टाकले आहे. या बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यादरम्यान श्रद्धाचा दोन वर्षापूर्वीच एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं असून यावरून आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना महत्त्वपूर्ण विधान केल असून या प्रकरणाचा चेंडू आता महविकास आघाडीकडे टोलवला आहे.

हेही वाचा Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा, शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिली होती. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटले होते. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहे.

devendra Fadnavis and Shraddha walker
'दोस्ती आगे चलती रहेगी...'; तेजस्वी यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी ते पत्र पाहिले (2020 मध्ये श्रद्धाने पोलिसांकडे केलेली तक्रार) आणि त्यात खूप गंभीर आरोप आहेत. या प्रकरणी तेव्हा कारवाई का झाली नाही याची चौकशी करावी लागेल. मला कोणावरही आरोप करायचा नाही पण अशा पत्रावर कारवाई झाली नाही, त्यानंतर ही घटना घडली. त्याची चौकशी केली जाईल. त्यावेळी कारवाई केली असती तर कदाचित श्रद्धाला वाचवता आले असते, असंही फडणवीसांनी म्हटलं.

याआधी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का?" असा सवाल शेलारांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.