Dharmaveer : 'धर्मवीर ३'मध्ये दिसणार देवेंद्र फडणवीस; केली मोठी घोषणा, स्वतःही काढणार एक चित्रपट

Dharmaveer : 'धर्मवीर ३'मध्ये दिसणार देवेंद्र फडणवीस; केली मोठी घोषणा, स्वतःही काढणार एक चित्रपट
Updated on

मुंबईः दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनार आधारित 'धर्मवीर २' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीसांनी आपणदेखील एक चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्व. आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेता घडवला.. अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा आज ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, ही फक्त चित्रपटाची टॅगलाईन नाही तर ही टॅगलाईन एकनाथ शिंदे आणि आमची आहे.. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही.

Dharmaveer : 'धर्मवीर ३'मध्ये दिसणार देवेंद्र फडणवीस; केली मोठी घोषणा, स्वतःही काढणार एक चित्रपट
Pooja Khedkar : पूजा खेडकर बेपत्ता? दोनवेळा समन्स पाठवूनही चौकशीसाठी आलीच नाही

फडणवीस पुढे म्हणाले की, धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येईल, असं कोणाला वाटलं नव्हतं. चित्रपटाचाही भाग दोन आला आणि शिंदे साहेबांचा भाग दोनदेखील सुरु झाला. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील.. कारण या दोघांनाही विचारांशी गद्दारी पटली नाही.

Dharmaveer : 'धर्मवीर ३'मध्ये दिसणार देवेंद्र फडणवीस; केली मोठी घोषणा, स्वतःही काढणार एक चित्रपट
ITR Filing on WhatsApp: आता व्हॉट्सॲपवरूनही आयटीआर भरता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

''शिंदे साहेब विचारांशी गद्दारी झाल्यामुळे तुम्ही सरकारमधून बाहेर पडून इकडे आलात. हा चित्रपट कधी केला माहिती नाही पण आमचाही रोल असला पाहिजे थोडा थोडा.. तो तीनमध्ये येईल.''

फडणवीस पुढे म्हणाले की, मलापण एक चित्रपट काढायचा आहे. मी जेव्हा चित्रपट काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील. आता धर्मवीर तीन, चार चित्रपटाची तयारी करा, अशाही अपेक्षा फडणवीसांनी बोलून दाखवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.