Devendra Fadnavis: भाजपची सूत्रे येणार महाराष्ट्राच्या हाती? देवेंद्र फडणवीस होणार राष्ट्रीय अध्यक्ष? मोदींच्या भेटीनंतर चर्चांना जोर

BJP National President: फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबियांसह भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना जोर आला आहे.
Devendra Fadnavis To Become New BJP National President
Devendra Fadnavis To Become New BJP National PresidentEsakal
Updated on

महाराष्ट्र भाजपचे महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशात फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबियांसह भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना जोर आला आहे.

भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याने भाजप त्यांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करणार आहे. त्यामुळे या पदासाठी ज्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबतचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

Devendra Fadnavis To Become New BJP National President
Vidhan Sabha Election : अधिक जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री ; मविआचा फॉर्म्युला,जागा वाटपावर चर्चा सुरू

जेपी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ यापूर्वीच संपला होता, पण त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने नव्या अध्यक्षांचा शोध सुरू केला आहे. यामध्ये दोन प्रमुख नावे महाराष्ट्रातून आहेत. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचा समावेश आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता आणि कन्या दिवीजाही उपस्थित होत्या. या भेटीनंतर भाजप फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Devendra Fadnavis To Become New BJP National President
Manoj Jarange : दरेकरांच्या अभियानाचा पर्दाफाश करू ; मनोज जरांगे, कोणत्याही आंदोलनाचे दडपण नाही

गेल्या काही काळापासून अध्यक्षपदाच्या चेहऱ्याचा शोध सुरू असताना काही नावांवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकमत होत नव्हते. मात्र, फडणवीस यांचे नाव समोर आल्यानंतर एकमत झाल्याचे, सूत्रांनी सांगितले आहे.

या सूत्रांनी पुढे सांगितले की, "फडणवीस यांना अध्यक्ष करायचे की एनडीएच्या मंत्रिमंडळात घ्यायचे याबाबत भाजमध्ये संभ्रम आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते की, फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावे. कारण यामुळे राष्ट्रीय राजकारणात दीर्घकाळ काम करण्यासाठी फडणवीस चांगल्या प्रकारे तयार होतीत."

"देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहेत. त्यामुळे ते संघाच्या जवळचे आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे चांगले संबंध असल्याने त्यांच्या अध्यक्षपदाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर होत आहेत," असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

"नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जोरदार फटका बसला. यासह त्यांच्याबाबत विविध समाजातमध्ये नकारात्मकतेचे वातावरण आहे. अशात त्यांना राज्यात ठेवणे पक्षाच्या हिताचे ठरणार नाही, म्हणून पक्ष त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणत आहे," आरएसएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.