Devendra Fadnavis : ''त्यांना यातलं काहीच कळत नव्हतं...'', शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला

uddhav thackeray and devendra fadnavis
uddhav thackeray and devendra fadnavis SAKAL
Updated on

मुंबईः आज नाशिक येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करीत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं. मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही.. शेवटी पवार साहेबांनी पुस्तक लिहिलं त्याच्यात सांगितलं त्यांना राजकारणातलं काहीच कळत नाही. परंतु आता असं नाही. आम्हांला राजकारणातलंही कळतं, सहकार, शेती आणि अर्थसंकल्पामधलंही कळतं.

uddhav thackeray and devendra fadnavis
Azam Khan : मोदी-योगींबद्दलची आक्षेपार्ह विधानं भोवली; आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

फडणवीस पुढे म्हणाले, आता जे निर्णय होतील ते सगळे निर्णय सामान्य माणसांच्या हिताचे होतील. शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय आपण घेतला, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकरी सन्मान निधाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात. हा नाशिक जिल्हा आहे, कुंभमेळ्याचा जिल्हा आहे. शासन आपल्या दारी हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे. आपली सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे आनंद आहे.

uddhav thackeray and devendra fadnavis
Devendra Fadnavis : अजितदादा एकटेच दिल्लीला गेले, म्हणजे फडणवीस 'साईडलाईन'; अंधारेंचा टोला

विरोधकांबद्दल बोलतांना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, चांगलं काम केलं, लाभ दिला तरी पोटात दुखतं. परंतु लोकांना लाभ मिळतो म्हणून लोकं येतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु कुणाच्याही पोटात दुखलं तरी डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तर अजितदादा सोबत आहेतच. अजितदादा मागच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, दोनच झेंडे आहेत. मात्र आच तिनही पक्षांचे झेंडे याठिकाणी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.