Anna Bhau Sathe : रशियात पुन्हा गाजणार अण्णा भाऊंचं नाव, फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण

मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी अनावरण केले जाणार आहे
Anna bhau Sathe
Anna bhau Sathe Sakal
Updated on

Anna Bhau Sathe Statue In Moscow : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा रशियात गौरव केला जाणार आहे. मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित असणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे, ही अतिशय गौरवाची आणि प्रेरणादायी बाब आहे. अण्णाभाऊंचे रशियात अनेक महिने वास्तव्य होते. मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या अनावरण समारंभासाठी रशियाला जाणार आहोत. असे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे.

Anna bhau Sathe
Maharashtra Political Crises : सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You?

आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी रशियन जनतेच्या मनातही वेगळे स्थान मिळवले असून, अण्णा भाऊंनी रशियाविषयी लिखाण केले आहे. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ लोकप्रिय असून, आण्णा भाऊंच्या अण्णा भाऊंच्या साहित्यात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्‍या यांचा समावेश आहे. अण्णा भाऊ साठेंनी दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर 'स्टॅलिनग्राडचा पोवाडा' ही दीर्घ काव्य रचना केली. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा पगडा होता. रशियामध्ये लेनिनने केलेल्या कामगारांच्या क्रांतीने ते भारावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.