Latest Mumbai news: मंत्रालयात शिरलेल्या एका महिलेने गुरुवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली. या महिलेने फडणवीस यांच्या नावाची पाटी उचकटून फोडली.
तसेच कार्यालयाबाहेर कुंड्यांची तोडफोड करत, आक्षेपार्ह बरळत मंत्रालयाबहेर पडली. या घटनेचे चित्रण शुक्रवारी सर्वदूर पसरल्याने याबाबत चर्चा झाली.