15 Thousand Jobs In Maharashtra
15 Thousand Jobs In MaharashtraEsakal

New Job In Maharashtra: महाराष्ट्रातील 15 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या, जाणून घ्या पुण्यासह कोणत्या शहरात किती जॉब?

15 Thousand Jobs: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या पदरात चार मोठे उद्योग पडले आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली.
Published on

Devendra Fadnavis X Post About New Jobs In Maharashtra:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या पदरात चार मोठे उद्योग पडले आहेत. 1 लाख 20 हजार कोटींचे हे उद्योग पुणे, पनवेल, विदर्भ आणि मराठवाड्यात होणार असून यातून 15000 हजारहून अधिक नोकऱ्या मिळणार आहेत.

याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली.

पुणे

पुण्याच्या चाकण एमआयडीसीत स्कोडा फोक्सवॅगनचा प्रकल्प येणार आहे. यामध्ये EV आणि हायब्रीड कारची निर्मिती होणार आहे. ही गुंतवणूक एकूण 15,000 कोटी रुपयांची असून यातून 1000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तळोजा एमआयडीसी

पनवेलमधील तळोजा एमआयडीसी येथे अदानी समूहासह टॉवर सेमीकंडक्टर 83,947 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामधून ॲनालॉग/मिक्स्ड सिग्नल आणि सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पातून 5,000 पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर, हायब्रीड वाहने, प्लगइन हायब्रिड वाहने,fuel cell EV, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी यासारख्या उत्पादनांची निर्मिती करणार आहे. यामध्ये एकूण 21,273 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यातून 8800 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतीत असे फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

15 Thousand Jobs In Maharashtra
Times Tower Fire: कमला मिल्स परिसरातील आगीत जेव्हा 14 जणांनी गमावला होता जीव; 200 लोकांसोबत 2017 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

"महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक"

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्राने सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ते म्हणाले की, "गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे."

15 Thousand Jobs In Maharashtra
Maharashtra Weather Updates: अतिवृष्टीचा इशारा, सहा लाख लोक विस्थापित, महाराष्ट्रात काय आहे पावसाची परिस्थिती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.