Devendra Fadnavis : निवडणुकीआधीच हे एकत्र राहू शकत नाही, तर...; इंडिया आघाडीवर फडणवीसांचा हल्लाबोल

Fadnavis attack on India Alliance: निवडणुकीच्या आधी हे एकत्र राहू शकत नाही...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal
Updated on

मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला शह देण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांनी चौफेर टीका करताना अनेक मुद्दांवर भाष्य केलं.

Devendra Fadnavis
Gandhi Jayanti 2023 : कोण आहे ओळखू येतंय का? गांधीजींच्या भूमिकेसाठी तब्बल ३० किलो वजन घटवलं!

फडणवीस म्हणाले की, निवडणुकीच्या आधी हे एकत्र राहू शकत नाही आणि नंतरही राहू शकत नाही. त्यांच्यात एकही राष्ट्रीय नेता नाही. आज मोदीजी कुठेही गेले तरी गर्दी असते. शरद पवार साहेबांचं केरळमध्ये भाषण ठेवलं तर कोण येणार, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला.

विरोधकांचा एकच संकल्प, तो म्हणजे मोदीजींचा विरोध करणे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहे. हे समोर आहेत, पण यांच्या पाठीशी एक शक्ती आहे, ज्या शक्तीला अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैश्यांवर हे लोक अराजकता आणू पाहात आहेत. यांना चीन फंडींग करत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

Devendra Fadnavis
Ajit Pawar News : आमच्या सरकारमध्ये फार तोरा दाखवणाऱ्यांचा आता आवाजच बंद; पटोलेंचा अजित पवारांना टोला

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, आपण दिलं आणि टिकवलं. जोपर्यंत आमचं सरकार होत तो पर्यंत सुप्रीम कोर्टात स्थगिती आली नाही. पण मविआच सरकार आले आणि आरक्षण गेले. ज्यांनी घालवले तेच आता तोंड वर करून आरक्षण मागत असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.