Ambabai Temple : 'पितळी उंबरा ओलांडून घ्या आता कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन'; कधी मिळणार मंदिरात प्रवेश? जाणून घ्या अपडेट

आज दुपारनंतर भाविकांना गाभाऱ्यातून दर्शनाला प्रारंभ होणार
Ambabai Temple
Ambabai Templeesakal
Updated on
Summary

गेल्या काही महिन्यांपासून भाविकांतून पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची मागणी होत होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple Kolhapur) दर्शन आता गर्दीचे दिवस वगळता पुन्हा पितळी उंबऱ्याच्या आतून घेता येणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. आज मंगळवारपासूनच (ता. २९) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृह आणि चप्पल स्टॅंड सुविधा केंद्र आदी कामांच्या उद्‌घाटनानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. कोरोनाच्या काळात भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद करून पितळी उंबऱ्यापासून दर्शन दिले जाऊ लागले. त्यानंतरही हा निर्णय कायम ठेवण्यात आला होता.

Ambabai Temple
Loksabha Election : शरद पवारांची मोठी खेळी, शाहू महाराजांना उतरवणार लोकसभेच्या रिंगणात? म्हणाले, जनतेच्या मनात..

त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भाविकांतून पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाची मागणी होत होती. दरम्यान, आज हा निर्णय झाल्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने तत्काळ आवश्यक त्या कामांना प्रारंभ झाला असून, मंगळवारी दुपारनंतर भाविकांना गाभाऱ्यातून दर्शनाला प्रारंभ होणार आहे.

...तर हुकूमशाही निर्माण होईल

पक्षांतर कायद्यांतील इतर तरतुदींचाही विचार झाला पाहिजे. पक्षाच्या अध्यक्षालाच सर्व अधिकार मिळाले तर हुकूमशाही निर्माण होईल. आलेल्या परिस्थितीनुसार कायद्यांमध्ये बदल होत असतात. राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Ambabai Temple
Adampur Balumama : आदमापूर बाळूमामाच्या पूजेसाठी 'या' कुटुंबातील महिलांना मिळाला मान; High Court चा महत्त्वपूर्ण आदेश

अनेक जिल्ह्यांत खुल्या प्रवर्गासाठीचे आरक्षणच शिल्लक नव्हते. त्यामुळे योग्य ती कार्यवाही केली जात आहे. सांगलीतील विषबाधा प्रकरणाची चौकशी केली जाईल. ज्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सुळकूड योजनेबाबत संयम हवा

मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकूड योजनेवरून रक्तपात होईल, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘मुश्रीफांनी तसे वक्तव्य केलेले नसावे. पण, रक्तपात, तलवारीची भाषा राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात शोभत नाही. सर्वांनी भान ठेवून बोललं पाहिजे.’ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. सध्या कोणाबद्दलही काहीही विधाने करण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, संयम बाळगला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Ambabai Temple
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता लालपरीतून करा स्वस्तात 'देवदर्शन'; महिलांना तिकिटात 'इतकी' सवलत, पुरुषांना किती?

‘मेन राजाराम’बाबत बंद दाराआड झाली चर्चा

मेन राजाराम हायस्कूलबाबत पालकमंत्री, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी महापालिका, जिल्हा नियोजन व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. हे हायस्कूल स्थलांतरित करण्यासाठी अशाच बंद दाराआड चर्चा झाल्या. त्यामुळे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये होती.

'सकाळ’चा पाठपुरावा

श्री अंबाबाईला येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहे नव्हती. विशेषतः महिलांना त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने मंदिर परिसरात स्वच्छतागृहांबरोबरच पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनासाठी भाविकांच्या मागणीचाही ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला.

Ambabai Temple
तब्बल 18 वर्षे काँग्रेसचं शहराध्यक्षपद भूषवलेल्या नेत्याचं निधन; प्रल्हाद चव्हाण यांनी घेतला वयाच्या 83 व्या वर्षी जगाचा निरोप

संभ्रमावस्था वाढण्याची शक्यता

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी गर्दीचे दिवस वगळता पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, गर्दीचे दिवस म्हणजे नेमके कोणते, याबाबत स्पष्टता द्यावी लागणार आहे. अन्यथा अचानक गर्दी झाली आणि पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शन सुविधा मिळाली नाही, तर पुन्हा वादाचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.