Nitin Gadkari : 'आंबेडकरांनी बुद्धाचं तत्वज्ञान स्वीकारलं, समता आणि बंधुतेचा आधार हाच बुद्ध धम्म आहे'

समता आणि बंधुतेचा आधार हाच बुद्ध धम्म आहे.
Nitin Gadkari Dikshabhumi
Nitin Gadkari Dikshabhumiesakal
Updated on
Summary

राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे, तर बुद्धाच्या विचारात विश्वकल्याणाचे सूत्र आहे.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे तत्वज्ञान स्वीकारले. देशाला मानवतावादी संविधान (Constitution) दिले. त्या संविधानावर देश प्रगती करत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.

दीक्षाभूमीवर आयोजित 67 वा धम्मचक्र प्रवर्तन (Dhamma Chakra Pravartan Din 2023) सोहळ्याच्या पर्वावर मंत्री गडकरी बोलत होते. राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे, तर बुद्धाच्या विचारात विश्वकल्याणाचे सूत्र आहे. यामुळे विश्वात याच धम्माच्या विस्ताराने शांती नांदेल, असेही ते म्हणाले.

Nitin Gadkari Dikshabhumi
Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी, लाखो अनुयायींनी घेतलं दर्शन

समता आणि बंधुतेचा आधार हाच बुद्ध धम्म आहे. देशभरातील बौद्ध स्थळे व बौद्ध लेण्या असलेली शहरे जोडण्यासाठी बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना आणली आहे, ती लवकरच साकारेल असा विश्वासही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari Dikshabhumi
Dikshabhumi : बुद्ध धम्मातील तत्त्वांचा समावेश असलेलं, आंबेडकरांनी भारताला दिलेलं संविधान सर्वात सुंदर आहे - देवेंद्र फडणवीस

बौद्ध राष्ट्रांना जोडणारा सेतू - डॉ. अफिनिता चाई चाना

धम्मदीक्षा दिनाची नोंद जागतिक इतिहासात सुवर्णक्षराने झाली आहे. याच दिवशी लाखो लोकांना बाबासाहेबांनी सामाजिक विषमतेच्या बंधनातून मुक्त केले. त्यांना स्वाभिमान दिला. मानवजातीला शांतीचा संदेश दिला. भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून बाबासाहेबांनी दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रांना जोडणारा आंतरराष्ट्रीय सेतू बांधला आहे, असे मत थायलंडच्या डॉ. अफनिता चाई चाना म्हणाल्या.

Nitin Gadkari Dikshabhumi
Maratha Reservation : मराठा समाजाचे एवढे आमदार असूनही आरक्षण देत नाहीत, पण आम्ही हे मुद्दाम..; काय म्हणाले अजितदादा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.