धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची Friendship कधी पासून सुरु झाली ?

Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendship
Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendshipesakal
Updated on

राज्यातलं राजकारण आत्ता कुठे शांत होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. पण आता पुन्हा एकदा राजकारणाच्या गोटात खळबळ माजणार का, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा झालेली भेट. (Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis)

धनंजय मुंडे यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही कोणत्या नव्या राजकीय अंकाची नांदी आहे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. मात्र धनंजय मुंडेंनी या शक्यता फेटाळल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री निवड झाली शुभेच्छा सदिच्छा भेट मुंडे यांनी घेतल्याने सांगितले जाते

Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendship
धनंजय मुंडे रात्री सागर बंगल्यावर; फडणवीसांची घेतली भेट

दोन टोकाचे विरोधक असणाऱ्या पक्षाचे हे नेते पण त्यांची मैत्री राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असते. मध्यंतरी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जेव्हा सरकार स्थापन केलं होतं तेव्हा त्या पहाटेच्या शपथविधीमागे धनंजय मुंडे आणि फडणवीस यांची मैत्रीचं कारणीभूत होती असं म्हटलं जातं. त्या रात्री अचानक मुंडे यांचं नॉट रिचेबल होणं यामागे फडणवीस होते का अशी शंका उपस्थित केली गेली. तर धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणाऱ्या करुणा मुंडे प्रकरणात देखील देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करायचं टाळलं होतं.

अशावेळी प्रश्न पडतो या दोन नेत्यांची मैत्री सुरु झाली तर कधी ?

धनंजय मुंडे हे भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे. बीड जिल्ह्यातील परळी येथे एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत परिश्रम पूर्वक भारतीय जनता पक्षात आपलं स्थान निर्माण केलं. प्रमोद महाजन यांच्या साथीने त्यांनी पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं.

महाजन आणि मुंडे ही जोडी जेव्हा नागपूरला जायची तेव्हा त्यांचा मुक्काम तिथले विधानपरिषद सदस्य असलेल्या गंगाधरपंत फडणवीस यांच्या घरी असायचा. याच गंगाधर फडणवीस यांचे सुपुत्र म्हणजे देवेंद्र. तेव्हापासूनच मुंडे आणि फडणवीस यांच्यात घरगुती संबंध निर्माण झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर देवेंद्र यांना राजकारणात आणण्यात आणि त्यांना महापौर पुढे आमदार बनवण्यात गोपीनाथ मुंडे यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली जाते.

Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendship
गोपीनाथराव मुंडे हे आज हयात असते तर... : धनंजय मुंडे

देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा ते गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी राहायचे. विधानसभेत देखील ते दोघे एकत्रच असायचे.विधानसभेत एखाद्या विषयावर महत्त्वाची नोट बनवण्यासाठी, माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत रहायचे."

याच काळात धनंजय मुंडे यांची देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगली मैत्री निर्माण झाली. 2000 ते 2004 च्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. युवा मोर्चात असताना त्यांची देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगलेच सुधारले. पुढे धनंजय मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी वाद झाले आणि त्यातूनच त्यांनी भाजपला रामराम ठोकला. पुढे राष्ट्रवादीमध्ये जाऊन देखील धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं कायम राहिलं.

मधल्या काळात अनेक घडामोडी घडून गेल्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मात्र आजही ही मैत्री कायम आहे. याचे राजकीय फायदे तोटे सहन करूनही त्यांनी आपली दोस्ती लपवलेली नाही. त्यामुळेच काल रात्री धनंजय मुंडे हे फडणवीस यांच्या भेटीला गेले असले तरी या मागे कोणतेही राजकीय अर्थ असण्यापेक्षा वैयक्तिक मैत्री हेच कारण असण्याची शक्यता जास्त आहे.

Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendship
देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ हा भाजपाचा गेमप्लॅन की आणखी काही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.