Dhananjay Munde : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला मुंडेंनी दिला आधार : घेतली मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Dhananjay Munde : आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर वाढतात
Farmers statement will considered as complaint Dhananjay Munde agriculture mumbai
Farmers statement will considered as complaint Dhananjay Munde agriculture mumbaiesakal
Updated on

Dhananjay Munde : यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अधिक माहिती अशी कि, मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत, या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

Farmers statement will considered as complaint Dhananjay Munde agriculture mumbai
Crime News : भात न शिजवल्याने पतीला राग अनावर; पत्नीच्या डोक्यात दांडका घालून केली हत्या

शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी मुंडेंना सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोनही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्यची मदत देण्याचे निर्देश दिले.

Farmers statement will considered as complaint Dhananjay Munde agriculture mumbai
Dhananjay Munde : कृषी मंत्री मुंडे यांची अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टबाबत महत्वपुर्ण भूमिका

दरम्यान आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये.

Farmers statement will considered as complaint Dhananjay Munde agriculture mumbai
Dhananjay Munde : बोगस खतं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द; धनंजय मुंडेंनी ट्वीट करुन दिली माहिती

कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहन या प्रसंगाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.