मुंबईः पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडलेल्या आहेत. भाजपसोबतच सत्तेत मंत्री असलेले त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी वैर विसरुन पंकजा मुंडे यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय वैर आहे. २०१४ मध्ये पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचा परळीमधून पराभव केला होता तर २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांचे विरोधक आहेत. असं असलं तरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. या तपासणीमध्ये कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार धनंजय मुंडे हे अडचणीत सापडलेल्या बहिणीला साथ देणार आहेत. पंकजा मुंडे यांच्याशी कारखान्याबाबत चर्चा करुन शक्य तेवढी मदत करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले असल्याचं कळतंय. त्यामुळे राजकीयदृष्ट्या दुरावलेले बहीण-भाऊ एकत्र येणार का? अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.