Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली

कोल्हापुरातील अजितदादा गटाच्या सभेत धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती.
Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली
Updated on

मुंबई : कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या सभेत धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. पायताणाची भाषा करणाऱ्यांच्या बरगड्या राहतील का? अशा आशयाचं विधान मुंडेंनी केलं होतं. त्याला आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्यांचा महाराष्ट्रात कोथळा बाहेर काढला जातो, हे कायम लक्षात ठेवा, असं आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. (Dhananjay Munde Vs Jitendra Awhad rusk emerged over Kolhapur rally of Ajit Pawar group aau85)

Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली
दलितांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, आंबेडकरांची पाडलेली कमान पुन्हा बांधणार; फडणवीसांची ग्वाही

आव्हाडांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवा बनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रात कोथळा बाहेर काढला जातो, हे कायम लक्षात ठेवा, असं ट्विट करत आव्हाडांनी मुंडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळं आता एकेकाळी राष्ट्रवादीत एकत्र नांदणाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळतं आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे.

Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली
Fadnavis on OBC: "कोणी वाटेकरी होईल असा गैरसमज ओबीसींनी करुन घेऊ नये"; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

शरद पवारांनी कोल्हापुरात घेतलेल्या सभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हसन मुश्रीफांवर टीका केली होती. कोल्हापुरी चप्पलेचा उल्लेख करत ''गद्दारी केलेल्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा वापर करावा लागेल'' असं ते म्हणाले होते. त्यावर मुश्रीफांनी कापशीच्या चपलेचा उल्लेख करत ती करकर वाजते आणि एकदा बसली की त्यांना कळेल, असं प्रत्युत्तर दिलं होतं.

Munde Vs Awhad: मुंडेंच्या 'बरगड्यां'ना आव्हाडांचं 'कोथळ्या'नं प्रत्युत्तर; राष्ट्रवादीतल्या गटांमध्ये जुंपली
Dhananjay Munde : ''ज्याने पायताणाची भाषा केली त्याच्या बरगड्या राहतील का?'' धनंजय मुंडेंचा आव्हाडांना टोला

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

कोल्हापुरातील जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेचा समाचार घेताना धनंजय मुंडे कालच्या सभेत म्हणाले, ''ज्यानं कुणी पायताणाची भाषा केली त्याला प्रेमानं जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी त्याच्या बरगड्या राहतील का?'' शरद पवारांच्या उपस्थितीत अशी टीका होणं दुर्दैवी असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.