Dhangar Reservation : समाजाला फसवत असाल तर समाज धडा शिकवणारच; वडेट्टीवारांचा भाजपला टोला

vijay waddetiwar
vijay waddetiwar
Updated on

मुंबई - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येण्यास सुरुवात झाली आहे. धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याची घटना आज सोलापुरात घडली. यावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

vijay waddetiwar
Dhangar Reservation : उधळलेला भंडारा विखे पाटलांनी खंडोबाचा आशिर्वाद समजावा; पडळकरांची प्रतिक्रिया

वडेट्टीवार म्हणाले की, 2014 मध्ये भाजप सरकारने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही. धनगर समाजाची मतं घेतली, त्यांना फसवण्याचं काम केलं. समाजाला फसवत असाल तर समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज धनगर समाजाने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

धनगर समाजाच्या भावनांचा विचार केला पाहिजे. कोणाचीही दिशाभूल करू नये. खोटं काम फार काळ टिकत नाही. तुमच राज्यात-केंद्रात सरकार आहे. कोणाला काय द्यायच याचा तुम्हाला आधिकार आहे. तुमची नियत साफ असेल तर ते काम होईल. तर फसवणाऱ्याला जनता सोडणार नाही, हे धनगर समाजाच्या प्रतिक्रियेतून दिसल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

vijay waddetiwar
Waghnakh : शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं युकेला कशी गेली? जाणून घ्या इतिहास

दरम्यान मराठा समाजाविषयीचा जो जीआर आता काढला तो जुनाच जीआर आहे. जुनी बाटली नवा लेबल आहे. कुठल्याही समाजाला कुठलंही प्रमाणपत्र द्यायच असेल तर त्याला तीन पिढ्यांच्या वंशावळीच्या दाखल्याची गरज असते. त्यामुळे हा जीआर पूर्वी सुद्धा काढला होता, यात काहीही नवीन नाही. वंशावळीमध्ये जो बसेल तो ते पाहून घेईन. वास्तविक हे सर्व समाजांसाठी लागू होत, असही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.