Dhangar Reservation: जालन्यात धनगर समाज आक्रमक का झाला? गोपीचंद पडळकरांनी सांगितलं कारण

धनगर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. एसटीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.
Dhangar Reservation
Dhangar Reservation
Updated on

जालना- धनगर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. एसटीमधून आरक्षण देण्यात यावे यासाठी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसह इतर गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंड पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज राज्यभर जिल्ह्याचे जिल्ह्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम झालाय.संपूर्ण कार्यक्रम शांततेत झाला. काल जालना येथील जिल्हाधिकारी यांनी निवेदन घेण्यासाठी खाली येईन असे सांगितले होते. मात्र आज एक तास वाट बघून देखील ते निवेदन घ्यायला आले नाही त्यामुळे तोडफोड झालीय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

Dhangar Reservation
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; जिल्हाधिकारी यांचे खासगी वाहन फोडले

प्रशासकीय अधिकारी ऐकत नाहीय. मी धनगर समाजाला सांगेन आपल्याला हे आंदोलन शांततेत घेऊन जायचे आहे. आपण सर्वांनी शांततेत आंदोलन करावे. जालना प्रशासनाला सांगणे आहे की जोर जबरदस्ती करून केसेस दाखल करू नये. पोलीस अधीक्षक यांच्याशी मी फोन वर बोलून चुकीची कारवाई होऊ नये असे सांगणार आहे, असं ते म्हणाले.

वेळ पडली तर मी जालनाला जाईन.सरकारने आता यावर लवकर मार्ग काढला पाहिजे. सरकार यातून मार्ग काढेल असा आम्हाला विश्वास आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावी.धनगर समाज आंदोलनाचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजवणीची मागणी आहे.आम्ही नव्याने कुठे आरक्षण मागत नाही, असं पडळकर म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी वेगळं आरक्षण दिले होते. तशी प्रक्रिया सरकार लवकर सुरू करेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, अशी माहिती देखील यावेळी पडळकरांनी दिली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()